Wednesday, 29 June 2011
जपानची रुंदी - Width of Japan
जपानची रुंदी - Width of Japan
जपानमधील सर्वात जास्त रुंदी असलेली राज्ये :
- प्रथम : होक्काईदो
- द्वितीय : इवातेकेन
- तृतीय : फुकुशिमाकेन
जपानमधील सर्वात कमी रुंदी असलेली राज्ये :
- प्रथम : कागावाकेन
- द्वितीय : ओओसाकाफू
- तृतीय : तोक्यौ-तो
Tuesday, 28 June 2011
जपानमधील सरोवरे - Lakes in Japan
जपानमधील सरोवरे - Lakes in Japan
१.बिवा-को हे जपानमधील सर्वात मोठे गोड पाणी असलेले सरोवर आहे. या सरोवराचे क्षेत्रफळ ६७० मीटर २ इतके आहे.ते शीगाकेन (Shiga Prefecture) येथे आहे .
२. कासुमीगाउरा हे जपानमधील दुसरे मोठे सरोवर आहे. हे तोक्यौ पासून पूर्वोत्तर ६० किलोमीटर अंतरावर इबाराकी केन येथे आहे. या सरोवराचे क्षेत्रफळ १६८ मीटर २ इतके आहे.या सरोवराचा उपयोग मासेमारी साठी केला जातो.
३. सारोमा-को हे जपानमधील ३ नंबर चे मोठे सरोवर आहे. हे होक्काईदो येथे असून होक्काईदो मधील सर्वात मोठे सरोवर आहे. या सरोवराचे क्षेत्रफळ १५२ मीटर २ इतके आहे.
Monday, 27 June 2011
जपानमधील पर्वत आणि नद्या - Mountains and Rivers in Japan
"उगवत्या सूर्याचा देश " जपान त्याविषयी काही अधिक माहिती :-
पर्वत
१. माउंट फुजी जपान मधील सर्वात उंच पर्वत असून त्याची उंची साधारण ३७७६ मीटर आहे. भौगोलिक दृष्ट्या त्याचे स्थान यामानाशी केन (केन =राज्य ) व सिझुओका केन याचा मध्ये आहे.
२. कितादाके हा त्याखालोखाल उंच आहे.त्याची उंची साधारण ३१९३ मीटर असून भौगोलिक दृष्ट्या त्याचे स्थान नागानो केन (केन =राज्य ) व यामानाशी केन याचा मध्ये आहे.
३. होदाकादाके हा ३ नंबर चा उंच पर्वत असून त्याची उंची साधारण ३१९० मीटर आहे. भौगोलिक दृष्ट्या त्याचे स्थान गीफुकेन केन (केन =राज्य ) व नागानो केन याचा मध्ये आहे.
नद्या
१. शीनानोखावा हि जपानमधील प्रमुख नदी आहे.तिची लांबी ३६७ किलोमीटर इतकी असून निइगाताकेन येथे तिचे उगमस्थान आहे.
२. तोनेगावा हि जपान मधील २ नंबर ची नदी आहे.तिची लांबी ३२२ किलोमीटर इतकी असून चीबाकेन व इबाराकी केन येथे तिचे उगमस्थान आहे.
३. इशिखारीगावा हि जपान मधील ३ नंबर ची नदी आहे.तिची लांबी २६८ किलोमीटर इतकी असून माउंट इशिखारी येथे तिचे उगमस्थान आहे.ती जपानमधील होक्काईदो मध्ये आहे.
Subscribe to:
Posts (Atom)